Sunday 23 October 2016

 मुरघास तयार करणे 
  
¨शेतकर्यांसाठी वरदान :
¨मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत आंबवून करून साठवलेला चारा होय .
¨यात हवा विरहीत अवस्थे मध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जिवांमुळे हिरव्या वैरनित असलेल्या साखरेपासून लाक्टिक आम्ल तयार होते.
¨आम्ल चारा  चांगल्या अवस्थेत ठेवण्याचेच काम करते.
¨हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो त्यात co-2 तयार होतो व उष्णता तयार.
¨जीवाणू तग धरू शकत नहीत,यामुळे चारा खराब होत नाही.
       मुरघासाची पिके 

 
¨उत्तम प्रकारचा मुरघास बनिविण्यासाठी मका ज्वारी संकरीत नेपिअर मार्वेल उसाचे वाढे ओट इत्यादी एकदल वर्गीय चार पिकांचा उपयोग करता येतो कारण साल कडक व टणक .
¨बाजरी,गवत,हा चारा फुलोर्यात असताना कापून मुरघास तयार करण्यासाठी आणावा.
 मुरघासाची खड्डा पद्धत 
 
¨मुरघासाच्या खड्ड्याची रचना बांधणी पद्धत हि त्या ठिकाणच्या परस्थिती वर अवलंबून असते.
¨खड्डा जास्तीत जास्त उंचीवर असावा.
¨चौरस खड्डा असल्यास हवा खेळती राहते.
¨खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी.
¨भिंतीची छिद्रे सिमेंटने गुळगुळीत करवित खड्ड्याची खोली हि त्या पाणी पातळी.
¨खड्डा खोदून  बांधकाम प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास खड्डा खोदाल्यंतर २०० मायक्रोन चा प्लास्टिक पेपर वापरावा. 
 मुरघासाचे नियोजन 
¨दुध उत्पादकांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाठी खड्ड्यात किंवा टाकीत मुरघासा करता येतो.
¨जनावरे किती आहेत मुरघास किती दिवसांकरता करायचा आहे तेवढा चार उपलब्ध आहे का?
¨उदाहरण एका शेतकर्याकडे चार जनावरे आहेत उन्हाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चार उपलब्ध होत नाही अशा वेळेस दुध उत्पादकाला खालील नियोजन करता येईल.
¨दुध देणारी एकूण चार जनावरे आहेत.
¨१२० दिवस प्रत्येक गाईस २० किलो प्रतिदिन मुरघास याप्रमाणे चार जनावरासाठी ८० किलो मुरघास द्यावा लागेल.
¨१२० दिवसाकरीता रोज ८० किलो प्रमाणे ९६०० किलो चार असणे आवश्यक आहे.
¨एक घनफूट खड्ड्यामध्ये (1 फुट लांब,1 फुट रुंद,१फ़ुट उंच )यामध्ये १६ किलो हिरव्या चार्याची कुट्टी मावते यावरून माप काढता येते.
¨एकून आवश्यक ९६००किलो,हिरव्या चार्यास १६ ने भागल्यास ६०० घनफूटटाचा खड्डा घ्यावा लागेल.(२० फुट लांब,६फ़ुट रुंद,५ फुट उंच. 
 मुरघास तयार करण्याची प्रक्रिया
 
¨पौष्टिक व संतुलित मुरघास बनविण्यासाठी त्यावर योग्य प्रक्रिया आवश्यक आहे.
¨प्रती टन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 1 किलो युरिया, 2 किलो गुळ,१किलो मीठ,1 किलो मिनरल मिक्श्चर, व 1 ली तक वापरावे.
¨युरिया,गुल,मिनरल पावडर,वेगवेगळ्या भांड्यात घेवून १०-१५ ली पाण्यामध्ये विरघळून घ्यावे. 
 मुरघासाचे फायदे 
 
¨मुरघास चारयातून पोषक आहार तत्वे मिळतात.
¨वाळलेल्याचार्यापेक्षा कमी जागा लागते.
¨1 घनमीटर जागेत ५०० किलो चार मावतो.शेतातील चारा कापून अनन्यामागील विल व कष्ट वाचतात.
¨टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो.
¨या चारयामध्ये प्रथिने,व karotin चे प्रमाण जास्त असते.
¨लाक्टिक आम्ल हे गाई म्हशीच्या पचनेन्द्रेयात तयार होणार्या रसासारखे असते.
¨चार वाया जात नाही.तो रुचकर,स्वादिष्ट,असतो.हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून हा मुरघास त्न्चैच्या काळात पाहिजे तेव्हा वापरता येतो.
¨पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार्या प्रदेशमध्ये झालेल्या हिरव्या चारयाचा मुरघास करून तो उन्हाळ्यामध्ये वापरता येतो.

No comments:

Post a Comment