Sunday 23 October 2016

विभाग गृह आणि आरोग्य प्रात्यक्षिक : चिक्की बनवणे



साहित्य :- शेंगदाणे(२५०), साखर किंवा गुळ(२५०  ), तूप(1/२ चमचा), पाणी (२ चमचे )  
साधने :- पक्कड, कढई, उ़लथणे, सुरी, गॅस, पाठ, लाटन, इ.    
कृती :- शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्यावरील टलफले काढून पाकळ्या केल्या. गुळाचा पाक तयार
      केला. पाक तयार झाला आहे कि नाही ते पाहण्यासाठी वाटीत थोडे पाणी घेवून त्यात गुळाचा       
पाक थोडासा टाकून त्यामध्ये पाकची गोळी तयार झाली असेल तर आपला पाक तयार झाला.                 
पाकामध्ये शेगदाणे घालून एक मिनिट हलवून घेतले. व गॅस बंद केला. ते मिश्रण गरम
असतानाच पाठावर घेतले. लाटण्याच्या साह्याने पसरून घेतले. सुरीने कट केले. या पद्धतीने 
आम्ही चिक्की बनवली.

                                                                                    कोंबडी पालन व्यवसायाचे महत्व व संधी 
  
Ò भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात ७०/ जनता शेती करते.
Òशेतकऱ्याने शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून आधुनिक व त्यानंतरहायटेक पद्धतीने शेती करत आहोत.
Ò    शेतकऱ्याने शेती करत असताना आपण जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळण्याचाव्यवसाय कमी प्रमाणात सुरु केला.
Òव त्यानंतर लोक या व्यवसायाकडे लोक व्यवसाईक दृष्टीकोनातून पाहू लागले.गेल्या१० ते १२ वर्षात कुकुट पालन व्यवसायात झपाट्याने बदल झाला असून आजभारताचा या व्यवसायात चीन,अमेरिका,जपान,रशिया नंतर क्रमांकलागतो.कारण पूर्वी या व्यवसायास शेतीस पूरक जोडधंदा म्हणून असे.परंतु आजपरस्थिती बदललेली आहे.

 
Òजगात भारताचा ५ वा क्रमांक असला तरी अफाट लोकसंख्येमुळे दरडोहीअंड्याचे प्रमाण ३३ आणि चिकन मांस ५२५ gm पडते.वास्तविक शास्रीयदृष्टीने दरडोही १८० अंडी आणि ९ किलो मांस असणे आवश्यक आहे.म्हणूनया देशात विस्ताराची आवश्यकता आहे.
Òदेशाच्या विकासाचा वेग बघता ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत,व दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी  अतिरिक्त आयोडीन व सरोत्तम आहारासाठी कमीपुंजी लागणारा व्यवसाय आहे.म्हणून बरेच लोक या व्यवसायाकडे वळले
Òहा व्यवसाय खूप चांगला असला तरी सद्य परिस्थितीत त्यांना होणारे रोगव त्यावरील उपचाराचा खर्च बराच होत असल्याने फायदा कमी होतचालला आहे.त्यांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगावर  प्रतिबंधकलसीशिवाय पर्याय नाही.
Ò       म्हणून या व्यवसायाकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पहिले तर तोकरताना त्यातील लहान सहान गोष्टीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे.हाव्यवसाय करताना साहित्य साधने त्यांचा योग्य वापर ,पक्ष्यांचेसंगोपन व आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
आहेत.
 मुरघास तयार करणे 
  
¨शेतकर्यांसाठी वरदान :
¨मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत आंबवून करून साठवलेला चारा होय .
¨यात हवा विरहीत अवस्थे मध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जिवांमुळे हिरव्या वैरनित असलेल्या साखरेपासून लाक्टिक आम्ल तयार होते.
¨आम्ल चारा  चांगल्या अवस्थेत ठेवण्याचेच काम करते.
¨हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो त्यात co-2 तयार होतो व उष्णता तयार.
¨जीवाणू तग धरू शकत नहीत,यामुळे चारा खराब होत नाही.
       मुरघासाची पिके 

 
¨उत्तम प्रकारचा मुरघास बनिविण्यासाठी मका ज्वारी संकरीत नेपिअर मार्वेल उसाचे वाढे ओट इत्यादी एकदल वर्गीय चार पिकांचा उपयोग करता येतो कारण साल कडक व टणक .
¨बाजरी,गवत,हा चारा फुलोर्यात असताना कापून मुरघास तयार करण्यासाठी आणावा.
 मुरघासाची खड्डा पद्धत 
 
¨मुरघासाच्या खड्ड्याची रचना बांधणी पद्धत हि त्या ठिकाणच्या परस्थिती वर अवलंबून असते.
¨खड्डा जास्तीत जास्त उंचीवर असावा.
¨चौरस खड्डा असल्यास हवा खेळती राहते.
¨खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी.
¨भिंतीची छिद्रे सिमेंटने गुळगुळीत करवित खड्ड्याची खोली हि त्या पाणी पातळी.
¨खड्डा खोदून  बांधकाम प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास खड्डा खोदाल्यंतर २०० मायक्रोन चा प्लास्टिक पेपर वापरावा. 
 मुरघासाचे नियोजन 
¨दुध उत्पादकांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाठी खड्ड्यात किंवा टाकीत मुरघासा करता येतो.
¨जनावरे किती आहेत मुरघास किती दिवसांकरता करायचा आहे तेवढा चार उपलब्ध आहे का?
¨उदाहरण एका शेतकर्याकडे चार जनावरे आहेत उन्हाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चार उपलब्ध होत नाही अशा वेळेस दुध उत्पादकाला खालील नियोजन करता येईल.
¨दुध देणारी एकूण चार जनावरे आहेत.
¨१२० दिवस प्रत्येक गाईस २० किलो प्रतिदिन मुरघास याप्रमाणे चार जनावरासाठी ८० किलो मुरघास द्यावा लागेल.
¨१२० दिवसाकरीता रोज ८० किलो प्रमाणे ९६०० किलो चार असणे आवश्यक आहे.
¨एक घनफूट खड्ड्यामध्ये (1 फुट लांब,1 फुट रुंद,१फ़ुट उंच )यामध्ये १६ किलो हिरव्या चार्याची कुट्टी मावते यावरून माप काढता येते.
¨एकून आवश्यक ९६००किलो,हिरव्या चार्यास १६ ने भागल्यास ६०० घनफूटटाचा खड्डा घ्यावा लागेल.(२० फुट लांब,६फ़ुट रुंद,५ फुट उंच. 
 मुरघास तयार करण्याची प्रक्रिया
 
¨पौष्टिक व संतुलित मुरघास बनविण्यासाठी त्यावर योग्य प्रक्रिया आवश्यक आहे.
¨प्रती टन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 1 किलो युरिया, 2 किलो गुळ,१किलो मीठ,1 किलो मिनरल मिक्श्चर, व 1 ली तक वापरावे.
¨युरिया,गुल,मिनरल पावडर,वेगवेगळ्या भांड्यात घेवून १०-१५ ली पाण्यामध्ये विरघळून घ्यावे. 
 मुरघासाचे फायदे 
 
¨मुरघास चारयातून पोषक आहार तत्वे मिळतात.
¨वाळलेल्याचार्यापेक्षा कमी जागा लागते.
¨1 घनमीटर जागेत ५०० किलो चार मावतो.शेतातील चारा कापून अनन्यामागील विल व कष्ट वाचतात.
¨टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो.
¨या चारयामध्ये प्रथिने,व karotin चे प्रमाण जास्त असते.
¨लाक्टिक आम्ल हे गाई म्हशीच्या पचनेन्द्रेयात तयार होणार्या रसासारखे असते.
¨चार वाया जात नाही.तो रुचकर,स्वादिष्ट,असतो.हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून हा मुरघास त्न्चैच्या काळात पाहिजे तेव्हा वापरता येतो.
¨पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार्या प्रदेशमध्ये झालेल्या हिरव्या चारयाचा मुरघास करून तो उन्हाळ्यामध्ये वापरता येतो.
                       गांडुळ खत 

गांडुळ जीवनक्रम - गांडुळाच्या जीवनामध्ये अंडीबाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.


गांडुळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती - १) जागेची निवड व बांधणी - गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेतकारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मिटरमधील उंची ३ मिटरबाजूची उंची १ मिटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मिटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मिटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.

गांडुळ खाद्य - चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा,पालापाचोळावाळलेले गवतउसाचे पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखतलेंडीखतसेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावेत्यानंतर या थरावर गांडुळेसोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखतशेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखतलेंडीखतसेंद्रीयखतटाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा.दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पध्दतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.

शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते.





- 
शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयारहोते. त्याचप्रमाणे लेंडीखतघोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळाभाजी पाल्याचे अवशेषअर्धवट कुजलेले पिकांची अवशेषसाखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगँस प्लँन्टमधून निघालेली स्लरीसुध्दा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापकवनस्पती रोगशास्त्र विभागकृषि महाविद्यालय पुणे-५ यांच्याकडेउपलब्ध होऊ शकेल. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल.

३) गांडूळखत वेगळं करणे - गांडुळखत आणि गांडुळे वेगले करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेतम्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकावखुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतीरीक्त दुस-या पध्दतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थरहलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडीत्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे. 

----------------------------------------
   
  


गांडुळखताचे फायदे - १) जमिनीचा पोत सुधारतो.
२) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
३) गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
४) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
५) जमिनीची धूप कमी होते.
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
७) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
९) गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्रस्फुरदपालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
१०) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
गांडूळखत वापरण्याची पध्दत व एकरी मात्रा - १) जमिनीतील सेंद्रीय पदार्थाच्या प्रमाणावर गांडूळ खताची मात्रा अवलंबून असते.
२) जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण ०.६ टक्के च्या वर असेल तर २ टन गांडूळखतप्रती एकर प्रती वर्षी ही मात्रा योग्या आहे. पण सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जर खूप कमी असेल तर इतर कंपोस्टशेणखत किवा हिरवळीचे खत पेंडी ह्यांची जोड देऊन गांडूळखत वापरावे.
 )





गांडूळ खताच्या विविध पद्धती -
उपलब्ध साधनसामग्रीशेतकऱ्याची आर्थिक कुवत आणि गांडूळ खताची गरज यानुसार गांडूळ खत तयार करण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. या सर्व पद्धतींमध्ये गांडुळाच्या आवडीनुसार खाद्याचे मिश्रण तयार करूनगांडुळांच्या संख्येत वाढ करणेत्याचप्रमाणे जागेची निवडही महत्त्वाची ठरते.

गांडूळ खतनिर्मितीसाठी सावलीओलावा आणि खेळती हवा हे मध्यवर्ती सूत्र लक्षात ठेवून खतनिर्मितीच्या विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. यामध्येही शेतकऱ्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार व गरजेनुसार थोडेफार बदल केले जाऊ शकतात. या पद्धती खालीलप्रमाणे आहेत-


बिछाना पद्धत -
झाडाच्या सावलीतगोठ्यात किंवा झोपडीत बिछाना तयार करावा. त्यासाठी सुमारे 90 सें. मी. रुंद व 15 सें.मी. जाडीचा व लांबी मात्र उपलब्ध सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार 150 ते 180 सें.मी. लांब अशा प्रकारचा बिछाना जमिनीवर तयार केला जातो. याकरिता उसाचे पाचटगव्हाचे तसेच भाताचे काड,सूर्यफूलतूरसोयाबीनमूग व उडीद काढणीनंतर उरलेले अवशेष किंवा जनावरांच्या गोठ्यातील उरलेली उष्टावळ यांचा वापर करावा. यावर 15 सें.मी. जाडीचा शेणखत मिश्रित मातीचा 3:1 या प्रमाणात थर द्यावा. त्यावर सुमारे दहा सें.मी. ताज्या शेणाचा थर देऊन चांगला ओला करून घ्यावा. यावर पूर्ण वाढ झालेली प्रत्येक चौरसफुटाला 100 गांडुळे सोडावीत व यावर परत 15 सें. मी. जाडीचा पालापाचोळा यांचा थर देऊन पोत्याने झाकून घ्यावा. बिछाना रोज पाण्याने ओलसर ठेवावा. जेणेकरून ओलाव्यामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास व गांडुळाच्या हालचालीस वेग येईल. अशा प्रकारे सुमारे 150 सें.मी. रुंद बिछान्यापासून एक ते दीड महिन्याच्या कालावधीत 250 ते 300 किलोग्रॅम उत्कृष्ट गांडूळ खत मिळवता येईल.


खड्डा पद्धत -
झाडाच्या सावलीतजनावरांच्या गोठ्याजवळ उंचवट्याच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा चांगला होऊ शकतोअशा जागेत सहा ते नऊ फूट रुंददोन ते अडीच फूट खोल, 12 फूट लांब खड्डा खोदला जातो. त्यामध्ये अर्धा फूट जाडीचा काडीकचरा व पिकांचे अवशेष यांचा थर देऊन चांगला दाबून घ्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेल्या वरच्या थरातील मातीचे मिश्रण 3:1 या प्रमाणात अडीच ते तीन इंचाचा थर देऊन पाणी शिंपडून भिजवून घ्यावे. त्यावर एक ते दीड इंचाचा ताज्या शेणाचा थर द्यावा व परत हलकेसे पाणी शिंपडून ओलावून घ्यावे आणि सहा ते आठ दिवसांनंतर त्यातील कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल.

त्यानंतर खड्ड्यातील उष्णता कमी झाल्यानंतर प्रति चौरसफुटाला 100 पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत व सेंद्रिय पदार्थानेच झाकून घ्यावे. नियमित पाणी शिंपडून ओलावा टिकवून ठेवावा. 30 ते 40 दिवसांनी त्याच क्रमाने खड्डा सेंद्रिय पदार्थअर्धवट कुजलेले शेणखत व माती यांचे 3:1 या प्रमाणात मिश्रण अडीच ते तीन इंचाचा थर व नंतर ताजे शेण एक ते दीड इंचाचा थर देऊन ओलावा द्यावा व गोणपाटाच्या पोत्याने झाकून घ्यावे. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकवून ठेवावा. 
साधारणतः दोन ते अडीच महिन्यात एक टन चांगले कुजलेले गांडूळ खत तयार होते.

सिमेंट टाकीपद्धती -
ही पद्धत थोडीशी खर्चिक असूनयामध्ये विटावाळू व सिमेंटचा वापर करून 12फूट लांबचार ते सहा फूट रुंद व दीड ते दोन फूट उंच अशा आकाराचे सिमेंटचेपक्‍क्‍या बांधकामाचे टाकी तयार केली जाते. टाकी ते भरण्यासाठी खड्डा पद्धतीत वर्णन केल्याप्रमाणे अर्धा फूट जाडीचा सेंद्रिय पदार्थाचा थर देवून ओला करून चांगला दाबून घ्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व जमिनीच्या वरच्या थरातील चाळलेली माती यांचे 3:1 प्रमाणातील मिश्रण अडीच ते तीन इंच थरात पसरून द्यावे व त्यावर ताज्या शेणाचा शेणकाला करून एक ते दीड इंचाच्याथराचा पसरून टाकावा. त्यावर हलकेसे पाणी देऊन ओलावून घ्यावे. अशाच क्रमाने दुसरा थर करावा व आठ ते दहा दिवसानंतर टाकीतील उष्णता कमी झाल्यानंतर प्रति चौरसमीटरला 100 या प्रमाणात पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत व खड्डा गोणपाटाने झाकून घ्यावा.

अधूनमधून पाणी देऊन खड्ड्यात ओलावा सतत टिकून राहील याची काळजी घ्यावी. संपूर्ण टाकीत मोकळ्या हवेचे व निर्माण होणाऱ्या उष्णतेचे नियमन व्हावे म्हणून त्यामध्ये मध्यभागी चहूबाजूंनी छिद्र पाडलेले पी.व्ही.सी. पाइपचे दोन फूट लांबीचे तुकडे दोन ते तीन फूट अंतरावर उभे पुरावेत. यामुळे गांडुळांना खोलपर्यंत खेळती हवा मिळते व उष्णतेचे उत्सर्जन होऊन अनुकूल वातावरण निर्माण होईल. अशा प्रकारे दोन ते अडीच महिन्यांत उत्तम कुजलेले दीड ते दोन टन गांडूळ खत एका खड्ड्यातून मिळेल. त्याशिवाय द्रवरूप गांडूळ खत (व्हर्मिवॉश) मिळविण्याकरिता उपयुक्त आहे. द्रवरूप गांडूळ खत मिळवण्यासाठी टाकीमध्ये एका बाजूला तळाशी हलकासा उतार देऊन पाझरणारे गांडूळ पाणी उताराच्या बाजूने टाकीच्या शेवटी एक ते दीड इंच व्यासाच्या प्लॅस्टिकच्या पाइपने प्लॅस्टिक बकेटमध्ये किंवा मातीच्या माठात एकत्रित केले जाऊ शकते.

गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व खनिज नत्राचे प्रमाण वाढते . 

गांडूळ खत (व्हमी कंपोस्ट )

ज्या खतात गांडूळाची विष्ठा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ ,गाडूळाची अंडीपुंज,त्यांच्या बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो त्या खतास गांडूळ खत म्हणतात .
जाती :आयसेनिया फिटीडी ,युड्रीलस ,लँम्पेटो मारूटी
संरक्षण :-उन्हाळ्यात ताट्याचे छप्परपावसाळ्यात प्लास्टिकचे छप्पर

१) गादी वाफे पध्दत

गादी वाफ्याची रुदी २ .५ फुट ते ३ फुट
लांबी आवश्यकतेनुसार
उंची ३-४ इंच ,एक किवा अनेक वाफे तयार करावयाचे असल्यास दोन वाफ्यातील अंतर १ फुट असावे. वाफ्यात ऊसाची वाळलेली पाने,गवत,पालापाचोळा ,शेतातील काडीकचरा इ . पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून वापरावे.